कोविड रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन तत्पर!

कोविड रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन तत्पर!

*कोकण  Express*

*कोविड रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन तत्पर!*

*सिंधुदुर्गनगरी – ता. ८ :*

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेला नविन ऑक्सीजन प्लॅन्ट आजपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्लॅन्टमुळे 25 ऑक्सीजनेटेड बेडची व्यवस्था झालेली आहे. तसेच सुधारित श्वाच्छोश्वास मास्कमुळे ऑक्सीजनची मात्रा योग्य प्रमाणात रुग्णांना मिळेल व ऑक्सीजनचा वापर हा काटकसरीने होणेस मदत होईल अशा प्रकारचे मास्क जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करणेत आलेले आहे. जास्त क्षमतेची 7 ड्युरा सिंलेडर उपलब्ध झालेले आहेत. लवकरच आणखी 7 ड्युरा सिंलेडर उपलब्ध होतील याचा पाठपुरावा घेणेत येत आहे. रुग्णांची वाढती संख्या व वाढते ऑक्सीजनचे प्रमाण गृहीत धरुन पुढील नियोजन (6 किलोग्रॅम क्षमता असलेले लिक्वीड ऑक्सीजन टॅन्क्‍ इत्यादीची) व्यवस्था करणेत येणार आहे. लवकरच जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी व कणकवली या ठिकाणी पीएसए टेक्नीकव्दारा निर्माण होणारा ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंन्डस्ट्रिज ॲग्रीकल्चर पुणे यांचेकडून प्राप्त झालेले 50 ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वितरीत करणेत आलेले आहेत. जिल्हा खनिजकाम विकास प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे निधीतून 6 नविन रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत व 6 प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!