जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या बदलीचा खोटा व बनावट आदेश प्रसारित करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध सायबर सेल मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा…कुडाळ मनसेची मागणी

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या बदलीचा खोटा व बनावट आदेश प्रसारित करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध सायबर सेल मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा…कुडाळ मनसेची मागणी

*कोकण Express*

*जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या बदलीचा खोटा व बनावट आदेश प्रसारित करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध सायबर सेल मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा…कुडाळ मनसेची मागणी*

*कुडाळ पोलीस निरीक्षक यांचेकडे कुडाळ मनसेचे निवेदन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

रविवार दिनांक 2 मे 2019 रोजी साधारणतः सायंकाळी सोशल मीडियावरून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे खोटे आदेश फिरले गेले. सदर आदेश प्रथमत: कोणी सोशल मीडियावर टाकले त्याची चौकशी सायबर सेल मार्फत करण्यात यावी आणि संबंधित इसमाविरुद्ध शासनाची व प्रशासनाची बदनामी केलेबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ मनसेच्या वतीने कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.कोरे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोशल मीडियावरिल महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग: शासन निर्णय क्रमांक: एईओ-१०२०/प्र.क्र६६/२०२२१/चार दि. २७/४/२०२१ या आदेशाची महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संकेत स्थळावर तपासणी केली असता अशा प्रकारचे आदेश उपलब्ध नाही असे दिसून येते.तसेच संकेत स्थळावरील क्रमांक चुकीचा असून सदर आदेशातील बदल यांचा तक्ता वेगळ्या फॉर्ममध्ये व इतर मजकूर वेगळ्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. शिवाय सदरील आदेशावर स्वाक्षरी मधील स.रि. बांदेकर-देशमुख, उपसचिव-महाराष्ट्र शासन यांच्याशी संपर्क केला असता त्यांची बदली दिनांक ३१/३/२०२१ रोजी त्या पदावरून अन्यत्र झाल्याचे कळते. परिणामी सदरचा आदेश हा बनावट व खोटा असून असून कोविड काळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सक्षम जिल्हाधिकार्‍यांना विचलित करण्याकरिता व मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हे कृत्य केलेले दिसून येत आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कोणीतरी वरिष्ठ अधिकारी अथवा अवैद्य खनिज उत्खनन करणाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने याची सायबर सेल मार्फत उच्चतस्तरीय चौकशी करून यामागील व्यक्तींचा शोध घ्यावा व फौजदारी कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टंगसाळी,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!