*कोकण Express*
*नांदगाव येथे कार–दुचाकीत अपघात*
*दुचाकीस्वार गंभीर जखमी : महामार्गावरील सर्व्हिस रोड वरील घटना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीहुन देवगड च्या दिशेने जाणारी एक्टिवा आणि कोल्हापूर वरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार या दोघांमध्ये नांदगाव सर्विस रोड येथे अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात घडला.
जखमी दुचाकी चालकाला अधिक उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कार भरधाव वेगात असल्याने दुचाकी कारच्या पुढील बाजूला अडकून फरफटत गेल्याचे समजते.
नांदगाव येथील ग्रामस्थांनी लगेच हायवे ठेकेदार कंपनीला नांदगाव ब्रिज बंद करण्यात सूचना दिल्या. तसेच ब्रिज बंद न झाल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावेळी नांदगाव शिवसेने शाखा प्रमुख राजा म्हसकर, भाई मोरजकर ग्रामस्थ आदम साठविलकर, भुपी मोरस्कर, प्रफुल तोरसेकर , बाळा सातवसे, जाफर बटवाले, बाळा मोरये, पंढरी वायंगणकर उपस्थित होते.
हा अपघात एवढा भयंकर होता की एका बाजूला हेल्मेट पडले होते तर गाडी दुचाकी आणि कार एकमेकांमध्ये अडकलेले दिसले. कारमधील चालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे.