जाणवलीतील गंभीर जखमी डॉ. सत्यवान नाटळकर यांचा मृत्यू

जाणवलीतील गंभीर जखमी डॉ. सत्यवान नाटळकर यांचा मृत्यू

*कोकण Express*

*जाणवलीतील गंभीर जखमी डॉ. सत्यवान नाटळकर यांचा मृत्यू…*

*कोल्हापूरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाले निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई – गोवा महामार्गावरील जानवली येथील हॉटेल निलम कंट्रीसाईड समोर दुचाकीला कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातामध्ये साईलीला हॉस्पिटलचे पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डॉ. सत्यवान नारायण नाटळकर ( ५० रा . नाटळ ,कुंभारवाडी ) यांचे कोल्हापूरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे अति रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत असणारे हरेश पांडुरंग सुतार ( २९ रा.नाटळ सुतारवाडी) त्यांच्यावर उपचार सुरु आहे हा अपघात सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. दुचाकी चालक डॉ. सत्यवान नारायण नाटळकर ( ५० रा . नाटळ ,कुंभारवाडी ) यांच्यासह हरेश पांडुरंग सुतार ( २९ रा.नाटळ सुतारवाडी ) हे तरळे ते नाटळ असे दुचाकी क्रमांक ( एम एच ०७ झ ०५८८) वरून जात असताना जानवली येथील हॉटेल निलम कंट्रीसाईड समोर पोहचले. त्यावेळी येथील पेट्रोल पंप येथे आले असता मागून येणारा कार चालक तेजस सागर घाडीगावकर ( ३४ रा.कुवळे , देवगड ) हे आपल्या कारची नंबर प्लेट बसवण्यासाठी जानवली येथील शोरुम येथे जात असताना यांची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला होता.
डॉ. सत्यवान नाटळकर हे मनमिळाऊ व चांगल्या स्वभावाचे असून त्यांचा नाटळ गावात चांगला जनसंपर्क होता. त्यांनी साईलीला हॉस्पिटलमध्येही रूग्णांच्या सेवेसाठी खूप चांगले काम केले होते.त्यांच्या या अचानक झालेल्या निधनामुळे नाटळ गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!