*कोकण Express*
*नियमांचे पालन करून मालवण कोरोना मुक्त करूया…*
*नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे नागरिकांना आवाहन*
*मालवण ः प्रतिनिधी*
लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मालवण नगर परिषदेकडून कोविड प्रतिबंधक आवश्यक त्या उपाय योजना राबवण्यात आल्या असून कोरोना विरुद्धची लढाई एकट्या प्रशासनाची नाही तर सर्व जनतेने एकत्र येऊन लढा द्यायची आहे . शासन स्तरावरून ज्या काही सूचना येतात त्याचे तंतोतंत पालन करा आणि मालवण कोरोना मुक्त करुया असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलेआहे.