आचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी

आचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी

*कोकण Express*

*आचरा ग्रामपंचायत कडून सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी*

*आचरा  ः  प्रतिनिधी*

आचरा आणि परीसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेतील संक्रमण झपाट्याने होत आहे. आचरा भागात दशक्रोशीतील नागरिकांची रेलचेल सातत्याने असते. म्हणूनच आचरा ग्रामपंचायतने गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेतले आहे. आचरा बंदर, आचरा बाजार, आचरा तिठा, आचरा परिसरातील मंदिर परिसर ठिकाणी जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी या फवारणीस सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर, सदस्य योगेश गावकर, राजेंद्र परब, ग्रामविस्तार अधिकारी परब, लिपिक नरेश परब, रुपेश परब उपस्थित होते.

आचरा गावात सातत्याने कोरोणाचे प्रमाण वाढत आहे. गावात आपल्या शेजारी किंवा आपल्या कुटुंबात परजिल्ह्यातुन अथवा परराज्यातुन कोणी नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य आल्यास त्याबाबची सर्व माहिती पोलीस पाटील, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका तसेच आचरा ग्रामपंचायतीकडे द्यावयाची आहे. जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला१४ दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक आहे. सर्दी ताप, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, इ. लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून रॅपिड अथवा RTPCR कोरोना चाचणी करावी. असे आवाहन आचरा ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामसमिती अध्यक्ष प्रणया टेमकर यांनी आचरा वासीयांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!