*कोकण Express
*सिंधुदुर्गात राज्य अध्यक्ष गजाजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन…*
*पत्रकारांच्या मागण्यांचे पालकमंत्री,खासदार,आमदार यांना दिले निवेदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी आज एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन बीड येथे सुरु केले आहे.त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेचे तर्फे सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन राज्यभर कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून करण्यात येत आहे.सावंतवाडी येथे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सावंतवाडी तालुका पत्रकार समिती यांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर,प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास नाईलाजाने यापुढे तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी दिला आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले.सावंतवाडी येथील आंदोलनात संतोष सावंत,राजेश मोडकर यांच्यासह पत्रकार सहभागी झाले होते.