*कोकण Express*
*कणकवली शहरात सर्वाधिक रुग्ण…*
*कणकवलीत १० दिवसांचा लॉकडाऊन..?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुका हा सर्वाधिक कोरोना रुग्ण मिळणारा एकमेव तालुका आहे. आतापर्यंतच्या गेल्या वर्षभरात सातत्याने कणकवली तालुक्यात आणि कणकवली शहरात सर्वाधिक रुग्ण मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले आहे. कारण आरोग्य क्षेत्रात असलेल्या आपल्या मर्यादा लक्षात घेऊन लवकरच कोरोना न रोखल्यास मृत्यूचे तांडव होण्याअगोदर लोकांचे जीव वाचवण्यासाठी हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कणकवली तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन एकमत करावे.
कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी किमान दहा दिवस तरी कडक लॉक डाऊन करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय आणि नेत्यांनी हा निर्णय एकत्रित घेणे अपेक्षित असून प्रशासकीय पातळीवर त्यांना सहकार्य आवश्यक आहे.
त्यासाठी कणकवली तहसील कार्यालय येथे सर्वपक्षीय व वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी एकत्रित अशी बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली सहमती लोकांसाठी दर्शविल्याचे समजते. त्यामुळे येत्या शनिवारपासून पुढील दहा दिवसांसाठी लॉकडाउन कणकवली शहरात व तालुक्यात होण्याची शक्यता आहे.