राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून दोडामार्ग कोविड सेंटरसाठी १७ बेड उपलब्ध

राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून दोडामार्ग कोविड सेंटरसाठी १७ बेड उपलब्ध

*कोकण Express*

*राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून दोडामार्ग कोविड सेंटरसाठी १७ बेड उपलब्ध…*

*तालुक्यातील पेट्रोलचा प्रश्न सोडवण्यासाठी,गोवा सिमा सोडून तपासणी नाके उभारण्यासाठी प्रयत्न*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढता आहे,तर दुसरीकडे कोविड सेंटर मध्ये बेड अपुरे पडत आहेत.याबाबतची माहिती मिळताच दोडामार्ग भाजपाचे नेते तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी स्वखर्चातून तेथील केंद्राला १७ बेड उपलब्ध करून दिले आहेत.त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.
दरम्यान तालुक्यातील लोकांचा पेट्रोलचा प्रश्न सुटावा यासाठी सिंधुदुर्गाच्या सीमेवर घालण्यात आलेली चेक पोस्ट गोवा सीमेवरील पेट्रोल पंप सोडून पुढील बाजूने काढण्यात यावी. त्यादृष्टीने गोवा प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढू,असे तहसीलदार अरुण खानोलकर यांनी सांगितले.याबाबत श्री म्हापसेकर यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!