प्रमोद जठार यांनी घेतले विनोद तावडे यांचे आशीर्वाद; सदिच्छा भेटीने राजकीय चर्चांना उधाण

प्रमोद जठार यांनी घेतले विनोद तावडे यांचे आशीर्वाद; सदिच्छा भेटीने राजकीय चर्चांना उधाण

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रमोद जठार यांनी घेतले विनोद तावडे यांचे आशीर्वाद; सदिच्छा भेटीने राजकीय चर्चांना उधाण*

*मुंबई/सिंधुदुर्ग*

भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय सरचिटणीस आणि खासदार सन्माननीय विनोद तावडे यांची विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जठार यांनी पत्नीसह तावडे यांचे आशीर्वाद घेतले. ही भेट कौटुंबिक आणि सदिच्छा स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत असले तरी, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीदरम्यान तावडे यांनी जठार यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्गातील भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती:
यावेळी प्रमोद जठार यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष बबलू सावंत, ज्येष्ठ नेते सुनील खाडये, युवा नेते अभिषेक जठार, सिंपली जठार, निलेश तेंडुलकर यांसह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची पकड मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण या भेटीतून दिसून आले. केंद्रीय नेतृत्वाचे आशीर्वाद आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ यामुळे प्रमोद जठार यांच्या प्रचारात आता मोठी गती येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!