*कोकण Express*
*मंगळवारी रात्री आ. नितेश राणे सोबत ची भेट ही राजकीय नसून योगा -योगाची….*
*शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा राईट हॅन्ड जि. प. सदस्य संजय आग्रे यांनी केला खुलासा…*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे जैसे थे. मंगळवारी रात्री आ. नितेश राणे सोबत ची भेट ही राजकीय नसून योगा-योगाने झालेली भेट. शिवसेना सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्याचा काहीही विचार नाही सतीश सावंत यांचा राईट हॅन्ड म्हणून कायमस्वरूपी राहण्याची इच्छा आहे. मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षात मा.पा. मंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक,आ. दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. आमच्या भागात बऱ्यापैकी शिवसेना वाढीसाठी आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करत आहोत. या काही भेटी राजकीय पक्षासाठी नसतात या भेटी वैयक्तिक येता-जाता रस्त्यावर होत असतात या भेटीत काही राजकीय स्वार्थ नाही मी पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले मी आणि संजय आग्रे यांनी एकत्रित शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संजय आग्रे आणि मी एक मेकाला सोडून कुठेच दुसऱ्या पक्षात जाणार नाही. शिवसेनेतील काम आमचे हे एकनिष्ठ ते चे आहे संजय आंग्रे यांच्या माध्यमातून फोंडा विभागात शिवसेना वाढत आहे याची धास्ती आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे म्हणून कोणाला तरी हाताशी धरून ही खोटी बातमी केली आहे शिवसेनेला धडकी भरवणारे अजून कोणी जन्माला आलेले नाही असे स्वप्न कोणी पाहू नये या कणकवली देवगड वैभववाडी तिनी तालुक्यामध्ये येणाऱ्या या कालावधीमध्ये शिवसेना आम्ही मजबूत करणार आहोत असे प्रतिपादन केले.