*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल सात बळी…*
*आरोग्य विभागाची माहीती ; नवे २८४ रूग्ण आढळले,सक्रीय रूग्ण २ हजार ७१४*
*सिंधुदुर्गनगरी ता.२०:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान जिल्ह्यात आज ७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून आणखी २८४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत,अशी असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.
मृतांमध्ये अंबडपाल, मुळदे-कुडाळ येथील ६३ वर्षीय महिला आहे.तिला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कनकनगर-कणकवली येथील ८५ वर्षीय पुरुष आहे.त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.न्हावेली-सावंतवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष आहे.त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.नांदगांव- कणकवली येथील ८० वर्षीय महिला आहे.तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.मेढा-मालवण येथील ७४ वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. भिकेकोनाळ-दोडामार्ग येथील ६० वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.कुणकवने-देवगड येथील ६१ वर्षीय पुरुष आहे.त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.