*कोकण Express*
*नडगिवे उपसरपंचपदी अरूण दामोदर कर्ले बिनविरोध*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
नडगिवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण दामोदर कर्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शिफारसीने निवड करण्यात आली. अडीच-अडीच वर्षप्रमाणे भावेश करले यांनी ठरत्याप्रमाणे राजीनामा दिल्याने या पदी सर्वाच्या मते अरुण कर्ले यांची निवड झाली. त्यांनी विविध सेवाभावी संस्था, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बुथ कमिटी प्रमुख अशा विविध संघटनेवर काम केले आहे. यावेळी सरपंच अमित मांजरेकर, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे, जि .प सदस्य रविंद्र उर्फ बाळा जठार, एकनाथ कोकाटे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.