*कोकण Express*
*जानवली सरपंच पदी भाजपाच्या शुभदा रावराणेच..!*
*भाजपा आणि राणे यांच्यावर केलेली कुरघोडी सेनेच्या पुन्हा आली अंगाशी… झाली नाचक्की..!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत प्रभारी सरपंच शिवराम राणे अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या जानवली सरपंच पदी कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. अखेर आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्या श्रिया सावंत, माजी जि.प.सदस्य रंजन राणे यांनी मेहनत घेत जानवलीचा गड राखला आणि भाजपाच्या शुभदा रावराणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. फोडाफोडी करूनही शिवसेनेला आपला सरपंच बसवता न आल्याने शिवसेनेची पुरती नाचक्की झाली..