*कोकण Express*
*कणकवलीत जेष्ठ वकील संदीप रघुनाथ वंजारे याना मातृ शोक*
*संगीता रघुनाथ वंजारे यांचे कणकवली येथे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील प्रसिद्ध जेष्ठ वकील संदीप रघुनाथ वंजारे यांच्या मातोश्री संगीता रघुनाथ वंजारे, वय ८२ वर्ष गाव कासार्डे, नागसावंतवाडी, सध्या राहणार कणकवली यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारी कणकवली येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कणकवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगीत रघुनाथ वंजारे या वयोवृद्ध होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. मंगळवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पच्छात त्यांचे जेष्ठ चिरंजीव वकील संदीप रघुनाथ वंजारे, दुसरे चिरंजीव संदेश रघुनाथ वंजारे दोन सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्या वकील आणि नोटरी मनाली संदीप वंजारे यांच्या त्या सासूबाई होत.
दरम्यान मंगळवारी कणकवली येथील स्मशान भूमीत संगीता रघुनाथ वंजारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.