*कोकण Express*
*कणकवली शहरवासीयांना लसीकरण करण्यासाठी रिक्षासह मदतीसाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्न करणार!*
*भाजपा शहरअध्यक्ष अण्णा कोदे यांची माहिती!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सध्या कोव्हीडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कणकवली शहर यांच्या वतीने मोफत लसीकरण देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला आहे. कणकवली शहरातील १७ प्रभागांमध्ये जे ४५ वर्षावरील जे नागरिक आहेत. त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत लसीकरण देण्यात येणार आहे, त्यासाठी लागणारी रिक्षा व मदतीसाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिली.
तसेच लसीकरणासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक शिशीर परुळेकर व शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.