*कोंकण एक्सप्रेस*
*उबाठ शिवसेनेचे उमेदवार जाहीर, उद्या करणार अर्ज दाखल..*
*वैभववाडी (प्रतिनिधी)*
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आले असून हे सर्व उमेदवार बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातून उद्योजक सुनील सदानंद नारकर, कोकिसरे जिल्हा परिषदेतून माजी सभापती शुभांगी उर्फ माई सरवणकर, तर लोरे जिल्हा परिषदेतून गेल्या वेळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या दिव्या दीपक पाचपुडे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
पंचायत समितीसाठी भुईबावडा पंचायत समितीतून तिरवडे सरपंच जितेंद्र तळेकर, कोळपे पंचायत समिती रिहाना काझी, उंबर्डे जिल्हा परिषदेतून माजी सरपंच स्मिता संतोष पाटील, कोकिसरे मतदार संघ हा मित्रपक्ष असलेला मनसेसाठी सोडण्यात आला आहे. याठिकाणी मनसेचा उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मात्र उशिरापर्यंत त्या उमेदवाराचे नाव समजू शकले नाही. लोरे पंचायत समितीतून माजी सभापती लक्ष्मण रावराणे तर खांबळे पंचायतीतून स्वप्निल रावराणे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आले असून हे सर्व उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी दिली.

