*कोंकण एक्सप्रेस*
*मॅरेथॉन स्पर्धेवर वेताळ बांबर्डेतील आदिवासी मुलांची मोहोर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
जागृती महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील मुलांनी चॅम्पियनशीप प्राप्त केली. तर खुल्या गटात आचरा येथील मेधा सातपुत्ते व उभादांडा येथील विराज भूते यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेचे उद्घाटन दै.तरूण भारत संवादचे संपादक शेखर सामंत आणि नाग्या महादू आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचे संचालक उदय आईर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, संजिवनी चव्हाण, शेखर साळगावकर, चारूदत्त शेणई, अर्चना गावडे, जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, सचिव अमोल सावंत, क्रीडा प्रमुख प्रशांत मालवणकर, सांकृतिक प्रमुख विवेक राणे, स्पर्धा प्रमुख ऐश्वर्या मालवणकर, चैताली पवार, ईशा मालवणकर, प्रतिक मालवणकर, नवनाथ सातार्डेकर, रवी पांगम, अमृत काणेकर, विनायक वारंग, योगेश वारंग आदी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेतील गटावार प्रथम सहा क्रमांक पुढीलप्रमाणे – बालवाडी – मुली – सिद्धी धुरी (ज्ञानदा शिशूवाटिका मठ), अमायरा गुडुळकर (उभादांडा), परिधी पालकर (वेंगुर्ला), मनस्वी पालकर (वेंगुर्ला), नित्या गावडे (ज्ञानदा शिशूवाटिका मठ), मुलगे – हर्ष देऊलकर (सरस्वती शिशूवाटिका वेंगुर्ला), सत्यम प्रजापती (शिवाजी प्राग.), राजवीर वायंगणकर (मदर तेरेसा स्कूल), प्रितेश मुकाडे (शिवाजी प्राग.), बाबुराव बरगाडे (तुळस),
पहिली ते दुसरी – मुली – अनु निकम, गार्गी निकम (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), नैतिका नांदोसकर (खानोली), सिया चव्हाण (परबवाडा), पूनर्वी दळवी (शिवाजी प्राग.), मुलगे – अक्षय पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), शिवम जगताप (शिवाजी प्राग.), कनेश कडगांवकर (मदर तेरेसा स्कूल), मैतक शाह (शिवाजी प्राग.), समर्थ बरगाडे (तुळस), सरोज पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह)
तिसरी ते चौथी – मुली – अनिता पवार, सुजांग पवार, उर्मिला पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), सुमव्या बागवान (वेंगुर्ला नं.1), इशिता रांजणकर (खानोली नं.1), स्पृहा नार्वेकर (मदर तेरेसा स्कूल), मुलगे – प्रिन्स पासवान (शिवाजी प्राग.), रूद्र पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), अस्मित गिरप (वेंगुर्ला नं.1), सुरज निकम, मंजुनाव दोडमानी (शिवाजी प्राग.), सागर पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह)
पाचवी ते सातवी – मुली – दिव्या मालवणकर (वेंगुर्ला हाय.), सानिका पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), अनन्या कुंभार (पाट हाय.), गार्गी परब (परबवाडा नं.1), अक्षया निकम, पायल पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), मुलगे – सुरज पवार, राहूल निकम, सूरज पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), युनिश अहमद (वेंगुर्ला हाय.), गुड्डू पासवान (वेंगुर्ला हाय.), अभि पेडणेकर (जनता विद्या. तळवडे)
आठवी ते दहावी – मुली – मनिष पवार (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), विधी परब (वेंगुर्ला हाय.), सुवर्णा वाघमारे, तनिष्का निकम (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), आकांक्षा कुंभार (पाट हाय.), मुलगे – आशीर्वाद सातपुते (आचरा), जितेश निकम (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह), गुरूनाथ मांजरेकर (जनता विद्या.तळवडे), भावेश यादव (डॉन बॉस्को ओरोस), रोहित निकम, सागर निकम (नाग्या महादू आदिवासी वसतीगृह)
खुला गट – महिला – मेधा सातपुते (आचरा), रेश्मा पांढरे, तृप्ती माडये, दिक्षा (मालवण), रूचिका केरकर (आसोली), नेहा बागकर (आरवली), पुरूष – विराज भूते (उभादांडा), जयेश सावंत (भडगांव), विश्वजित देवळेकर (देवगड), प्रज्वल शिंदे (मालवण), शंकर ठाकूर, शंकर परब (कुडाळ).
बक्षीस वितरण नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, गौरी मराठे, गौरी माईणकर, तरूण भारत संवादचे संपादक शेखर सामंत, जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, नवनाथ सातार्डेकर, योगेश वारंग, सुनील चव्हाण, संजिवनी चव्हाण, अर्चना गावडे, पिंटू कुडपकर, शेखर साळगावकर, अरविंद चव्हाण, चारू शेणई, प्रशांत मालवणकर, अमोल सावंत, विवेक राणे, महेंद्र घाडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

