*कोकण Express*
*खारेपाटण चेकपोस्टला आजपासून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यां सर्व प्रवाशांची रॅपिड टेस्ट सुरू*
*दुपारी १ वाजेपर्यंत ३० लोकांच्या करण्यात आल्या रॅपिड टेस्ट*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा सीमा तपासणी नाका खारेपाटण चेकपोस्ट येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.या चेकपोस्टला जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट रविवारपासून सुरू करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्याबाहेरून आलेल्या आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांचीच रॅपिड टेस्ट होत होती. परंतु, आजपासून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या सर्वच लोकांची रॅपिड टेस्ट करण्यात येत असल्याचे समजते. यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा सर्वच प्रवाशांची रॅपिड टेस्ट खारेपाटण चेकपोस् ला करण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी पोलीस यंत्रणेकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा सीमेवर खारेपाटण येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची येथे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील अशा प्रवाशांची रॅपिड टेस्ट खारेपाटण चेकपोस्ट येथे आजपासून करण्यात येत आहे. तसेच वाहनांची तपासणी करणे, कोणाला सर्दी ताप खोकला किंवा कोरणा संसर्गाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीची रॅपिड टेस्ट करून जर एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाला तर त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. सदर व्यक्ती कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट भागातून आली आहे का याची माहिती घेणे ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणे, थर्मल गण, प्लस ऑक्सिमिटरचा वापर करून प्रवाशांची तपासणी करण्याचे काम सध्या खारेपाटण चेकपोस्ट येथील आरोग्य पथकाकडून करण्यात येत आहे.