*कोकण Express*
*अखेर सावंतवाडी तालुक्याच्या कोविड केअर सेंटर भोसले पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्याचे कोविड केअर सेंटर अखेर चराठा ओझरवाडी येथील भोसले पॉलीटेक्निक कॉलेज येथे सोमवारी दुपारी हलवण्यात आले. जवळपास 9 रुग्ण या सेंटरमध्ये सध्या दाखल असून त्यात तीन वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या सेंटरची पाहणी सभापती निकिता सावंत यांनी केली. येथे डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय आणि साफ सफाई कर्मचाऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शिरोडकर यांच्याकडे केल्या. यापूर्वी त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम पाटील यांची उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांच्याशीही चर्चा केली.