खास. नारायण राणेंनी दिला मदतीचा हात

खास. नारायण राणेंनी दिला मदतीचा हात

*कोकण Express*

*खास. नारायण राणेंनी दिला मदतीचा हात….!*

*राणेंच्या “लाईफटाईम कोव्हीड सेंटर”च्या बेडची क्षमता १०० वर…..*

*कोरोना रुग्ण वाढीमुळे बेडची संख्या वाढविली…!*

*तर जिल्ह्यातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीचा निर्णय!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पडवे येथील लाईफटाईम हाॅस्पीटल मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कोव्हीड सेंटर मध्ये बेडची क्षमता पन्नास वरून शंभर इतकी वाढविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईफटाईम हाॅस्पीटल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी पडवे लाईफटाईम हाॅस्पीटल मध्ये कोव्हीड सेंटर सुरू केले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात सर्वच शासनाच्या आणि खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये सुद्धा उपचारासाठी बेड मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे, निलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी लाईफटाईम कोव्हीड सेंटरची क्षमता वाढवून शंभर बेडची व्यवस्था केली आहे.

पडवे लाईफटाईम कोव्हीड सेंटर हे अद्यावत आहे. तसेच सःशुल्क आकारून येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या ठिकाणी उपचार घेऊन दिवसागणिक अनेक रुग्ण बरे होत आहेत.त्यात बेडची संख्या ५० वरून शंभर एवढी वाढविली आल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!