*कोकण Express*
*निवजेतील दुग्ध उत्पादक संस्थेला सतीश सावंतांनी दिली भेट..*
निवजे येथील श्री निवजेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूला आज जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी भेट दिली.याप्रसंगी त्यांनी गावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर,निवजे संस्था अध्यक्ष संतोष पिंगुळकर, उपाध्यक्ष विल्यम डिसोजा, गोकुळचे डॉ. रेडकर,पोलीस पाटील सौ. प्राची शेडगे, ग्रा.प. सदस्य सूरेश गवाणकर, माजी सरपंच महेंद्र पिंगुळकर, महादेव पालव, पांडू पालव, दत्ता सावंत, सचिव अभय परब, निवजे सोसायटी चेअरमन सूर्यकांत सावंत व संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.