*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्य मराठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जाहीर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य मराठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ कार्यकारणी काल जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी श्री. संजय भाईप यांची, तर उपाध्यक्षपदी प्रसन्न गोंदावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी विनय वाडकर, खजिनदार पदी सिद्धीका भांड्ये, तर सदस्य म्हणून अजित दळवी, विष्णु चव्हाण, उमेश जाधव, संजय पिळणकर, शैलेश लाड यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बांदा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सावंतवाडी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिद धुरी उपस्थित होते.