*कोकण Express*
*कणकवली छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासाठी अद्याप प्रस्तावच नाही!*
*ज्या दिवशी प्रस्ताव येईल, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ५० लाखांचा निधी देवू; पालकमंत्री उदय सामंत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी अद्याप प्रस्तावच सबंधितां आलेलाच नाही. जर प्रस्ताव आला तर आपण तात्काळ ५० लाखांचा निधी देवू, अशी माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पालमंत्री पुढे म्हणाले, कणकवली न. पं.ने मागितलेल्या सर्व कामांना निधी दिला गेला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांना विचारा निधी दिला आहे की नाही ते. श्रीधर नाईक उद्दानाचे पैसे देखील न.पं. जवळ आलेले आहेत. तर महाराज्यांच्या पुतळ्या संदर्भात आपण खासदार विनायक राऊत यांच्यासह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सुद्धा भेटलो, त्यावेळी श्री. गडकरी यांनी देशपांडे सचिवांना देखील महाराज्यांच्या पुतळ्याचे काम तात्काळ झाले पाहिजे असे सांगितले आहे. मात्र अद्याप संबंधितां कडून प्रस्तावच नाही. ज्यांना शिवाजी महराज्यांचा पुतळा तात्काळ व्हावा आणि त्यांना महाराज्यां बद्दल आदर असेल तर प्रस्ताव द्या, आपन दुसऱ्याच दिवशी सुमारे ५० लाखांचा निधी मंजूर करतो. त्यासाठी अन्य कुठेही जाव लागणार नाही. केवळ खासदारांना बैठकीत प्रश्न विचारुन काही साध्य होणार ? असा सवाल श्री. सामंत यांनी केला.
त्यानंतर पुढे श्री सामंत म्हणाले, पुतळ्याच्या स्थळांतरासाठी जी जागा मागितली जाते ती सार्वजनिक बांधकाम व जि. प. यांच्या संदर्भातील असून याबाबत संबंधितां कडून प्रस्ताव येणे आवश्यक आहे. तसेच पुतळ्यासाठी मीच सांगितलेली जागा योग्य आहे, असे माझे मत नाही. तर दिशा समितीच्या बैठकीत शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्या बद्दल जागेसाठी सर्वांचे एकमत झाले असेल, त्याला माझी हरकत नाही. आपण शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासाठी निधी कधी कमी पडू देणार नाही.