कणकवलीत अनावश्यक फिरणाऱ्याची पटवर्धन चौकात केली जातेय रँपीट टेस्ट

कणकवलीत अनावश्यक फिरणाऱ्याची पटवर्धन चौकात केली जातेय रँपीट टेस्ट

*कोकण Express*

*कणकवलीत अनावश्यक फिरणाऱ्याची पटवर्धन चौकात केली जातेय रँपीट टेस्ट….!*

*महसूल कर्मचारी,नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आली मोहीम…!*

*विकेंडच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ; अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने कडकडकीत बंद….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*(संजना हळदिवे)

कणकवली तालुक्यात संचारबंदीची कडक अंमलबजानी केली जात आहे. कणकवली पटवर्धन चौकात आता आरोग्य विभाग, पोलीस व नगरपंचायत प्रशासन यांच्यामार्फत अनावश्यक फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.त्यात एक स्थानिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

कणकवली पटवर्धन चौक येथे संचारबंदीत विना मास्क व अनावश्यक फिरत असलेल्या लोकांची ऑक्सिजन लेवल, टेंपरेचर तपासून कोरोनाची लक्षणे आढळल्यास लगेच रॅपिड टेस्ट केली जात आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची ही तपासणी होणार आहे.

आरोग्य पथक,महसूल कर्मचारी , पोलीस अधिकारी, नगर पंचायत कर्मचारी असे पथक आहे. यावेळी आरोग्य विभागाचे सुविधा सावंत,महसूल अरविंद गवळी,पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील,नगरपंचायत कर्मचारी रवींद्र महाडेश्वर, प्रशांत राणे, रमेश कदम,सचिन तांबे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!