*कोकण Express*
*पाणी समस्यांंबाबत तात्काळ आराखडे सादर करा : संजना सावंत*
जलजीवन मिशन अंतर्गत शासन निर्णयानुसार ग्रामिण भागातील घरगुती कनेक्शनची क्षमता प्रती मानसी ५५ लीटर एवढे पाणी पुरवठा करणेबाबत तसेच यासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींनी आराखडयातील त्रुटींची पूर्तता करून हे आराखडे व अंदाजपत्रके तात्काळ तालुकास्तरावरील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय प.स कणकवली यांचेकडे सादर कराव्यात अशी सूचना जि.प.अध्यक्षा संजना सावंंत यांनी केली.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुकास्तरीय कामांची आढावा बैठक पंचायत समिती कणकवली येथे जि.प.अध्यक्षा संजना सावंंत यांनी आयोजित केली होती. यामध्ये कणकवलीतील पाणी टंचाई संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली व कामे कशा प्रकारे करून पाणी टंचाईचा प्रश्न सोडवता येईल यासंदर्भातही चर्चा करण्यात आली . तसेच रू .२.५० च्या वरील अंदाजपत्रकीय रकमेची कामांचे प्रस्ताव जि.प स्तरावर त्वरीत सादर करण्याच्या सुचनाही संबंधित विभागांस देण्यात आल्या. तसेच प्रपत्र ब मधील कामे तात्काळ पूर्ण करून घेणेबाबतच्या सुचना देण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये ग्रामिण भागात पाणी टंचाई उदभवू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी सज्ज रहाण्याच्या सुचनाही अध्यक्षा संजना सावंत यांनी दिल्या . या सभेस सभापती मनोज रावराणे , माजी जि.प.अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटया सावंत , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पूरवठा श्रीपाद पाताडे , उपअभियंता उदयकुमार महाजनी , कनिष्ठ अभियंता एन. पी. घुरसाळे , विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग ,ग्रा.पं . पाणी व स्वच्छता विभाग बीआरसी श्रीम.हरकुळकर हे उपस्थीत होते. यावेळी कणकवली पंचायत समिती नवीन इमारत बांधकाम पाहणी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केली.