*कोकण Express*
*मोफत शिवभोजनथाळीचा कुडाळात शुभारंभ*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शहरात शिवसेनेच्या वतीने मोफत शिवभोजन थाळीचा शुभारंभ आमदार वैभव नाईक व तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मुलगा कै. देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ दुपारी १२ ते ३ या वेळेत शिवभोजन थाळी शिवसेना शाखेसमोरील गणेश कृपा या ठिकाणी मोफत उपलब्ध असणार आहे. कुडाळ मधील कामगार, व्यापारी, नागरिकांनी तसेच अत्यावश्यक वस्तू पुरवणाऱ्या वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय पडते यांनी केले आहे.
यावेळी आंदुर्ले सरपंच पुजा सुर्वेकर, आनंद पराब, संतोष पाटील, दिलीप सुर्वेकर आदी उपस्थित होते.