*कोकण Express*
*कोरोना संचारबंदी दरम्यानच्या कालावधीत इतर घटकांप्रमाणे माथाडी कामगारांनाही राज्य सरकारने आर्थिक सहाय्य करावे….*
*ठाकरे सरकारने माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांकडे देखील सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे…*
*स्वाभिमानी कामगार संघ,सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची मागणी*
वाढत्या कोरोना विषाणू आपत्ती पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा लोकडाऊन चे आवाहन केले आहे.त्या अनुषंगाने रिक्षा व्यावसायिक,बांधकाम कामगार, नोंदणीकृत फेरीवाले आदी घटकांना आर्थिक सहाय्य देण्याचे घोषित केले आहे.मात्र यामध्ये माथाडी कामगार घटकाचा समावेश नसल्याने माथाडी कामगारांमध्ये आपल्यावर अन्याय केला जातोय अशी भावना निर्माण झालेली आहे.तरीही राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी माथाडी कामगार वर्गाकडे व त्यांच्या कुटुंबीयांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष वेधून इतर घटकांप्रमाणेच आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर करावे अशी स्वाभिमानी कामगार संघ,सिंधुदुर्गची आग्रही मागणी आहे.