*कोकण Express
*हरकुळ बुद्रुक चे माजी सरपंच रमेश पावसकर यांचे निधन*
*कणकवली प्रतिनिधी*
हरकुळ बुद्रुक गावचे माजी सरपंच व भाजपाचे कणकवली तालुका सरचिटणीस रमेश सुर्यकांत पावसकर (वय 40) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. हरकुळ – बुद्रुक सापळेवाडी येथील रहिवासी असलेले रमेश पावसकर हे त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे असल्याने सध्या मुंबईत वास्तव्यास होते. बुधवारी रात्री टीव्ही पाहत असतानाच त्यांना घरी हृदयविकाराचा तीव्र झटका येत त्यांचे निधन झाले. हरकुळ बुद्रुक गावच्या विकासात त्यांचा सक्रीय सहभाग असे. तसेच गेले काही वर्षे भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. नेहमी हसतमुख स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.