*कोकण Express*
*सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटरला सौ. संजना सावंत यांची भेट : रुग्णांची केली विचारपूस*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटरला जि.प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी भेट देत रुग्णांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेतला. रुग्णांना चांगले जेवण द्या. निकृष्ट जेवण दिला तर खपवून घेणार नाही असा सज्जड दम त्यांनी वैद्यकीय यंत्रणेला दिला आहे.
बेचव जेवण दिले जात आहे. आम्ही ठणठणीत बरे आहोत. आम्हाला या तुरुंगातून मुक्त करा. अशी विनंती काही कोरोना रुग्णांनी यावेळी केली.
जेवणाबाबत तक्रारी असतील तर ठेकेदार बदला. अशा सूचना सौ. सावंत यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांना दिल्या. कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्याकडून संजना सावंत यांनी माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी तालुक्यात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णसेवेत अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, प्राची तावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, आनंदा चव्हाण आदी उपस्थित होते.