*कोकण Express*
*लोरे परिसरात पावसाचा जोरदार तडाखा..!*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
मंगळवारी सायंकाळी लोरे, गडमठ व आचिर्णे परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
तालुक्यातील लोरे, गडमठ व आचिर्णे परिसरात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. एकीकडे वाढत्या कोरोनाने धास्तावलेली जनता त्यात अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.