*कोकण Express*
*४८ वर्षीय पोलीस हवालदार प्रवीण गांगजी यांच न्युमोनियाने दुःखद निधन….*
*कणकवली प्रतिनिधी:*
४८ वर्षीय पोलीस हवालदार प्रवीण सूर्यकांत गांगजी यांच न्युमोनियाने दुःखद निधन झालं आहे. कणकवली कलमठ हे त्यांचे मूळ गाव. त्यांना न्युमोनिया झाला असल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. रानबांबुळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे. १९९१ साली ते सेवेत रूजू झाले होते.