*कोकण Express*
*अखेर डॉ.श्रीमंत चव्हाण यांना जामीन मंजूर!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकेत असलेले जिल्ह्याचे तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी पंधरा हजाराच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. डॉ.चव्हाण यांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
डॉ.चव्हाण यांच्या विरोधात जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कर्मचार्यांने विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत डॉ.चव्हाण यांनी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे डॉ.चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
दरम्यान डॉ.चव्हाण स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते. त्यानंतर त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. डॉ.चव्हाण यांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांच्याकडे जामिनासाठी अर्ज केला होता. सरकार पक्षाच्यावतीने डॉक्टर चव्हाण यांना जामीन देण्यास जोरदार युक्तिवाद करत आक्षेप घेण्यात आला. तर डॉ.चव्हाण यांच्या बाजूने ऍड.उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला ऍड. सावंत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने डॉक्टर चव्हाण यांची सशर्त जामिनावर मुक्तता केली.