*कोकण Express*
*मांगवली येथील रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
*सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांचे उल्लेखनीय कार्य*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा मांगवली, सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र व ग्रामपंचायत मांगवली तसेच सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मांडवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या रक्तदान शिबिरामध्ये 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाच्या या कार्यात तरुणांनी सहभागी व्हावे या हेतूने लकी ड्रॉ चे आयोजन केले होते त्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते अभिषेक संसारे व सुरेंद्र नारकर यांना हेल्मेट तर तृतीय क्रमांकाचे विजेते प्रसाद पालांडे यांना ईयरफोन या भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच इतर सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे मांगवली चे सरपंच सुवर्णा लोकम, सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्राचे अध्यक्ष महेश संसारे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी चे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, जिल्हा ब्लड बँक सिंधुदुर्ग चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश मोंडकर, प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे चे डॉक्टर दर्शन साखरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र राणे, शिवानी नाटेकर, प्रसाद जावडेकर, स्नेहल राणे, शरद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.