*कोकण Express*
*कणकवलीत रविवारी ही विकेंड लॉगडाऊन ची कडक अंमलबजावणी…!*
*ठीक ठिकणी पोलीस बंदोबस्त ; शहरात निरव शांतता…!*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवलीत तालुक्यासह शहरात रविवारी ही विकेंड लॉगडाउची कडक अंमलबजावणी पाहायला मिळाली. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये कणकवली पटवर्धन चौक, नरडवे नाका, रेल्वे स्टेशन ,पटकी देवी मंदिर, ढालकाठी या सर्वच ठिकाणी पोलिसांसह होमगार्ड ही सैन्यात करण्यात आले आहेत.कोरोनाचे निर्बंध असल्याने शनिवारी व रविवारी सकाळच्या सत्रात संपूर्ण कणकवलीकरांणी कडक लॉगडाऊन अमलबजावनी केली असल्याचे पाहायला मिळाले.तर
बसस्थानकात प्रवासी नसल्याने बससेवा सुरू बंद होती. तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू असून तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली असल्याचे चित्र आहे. कणकवली शहरात अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त मेडिकल दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त सर्वच आस्थापने बंद आहेत.शहरांमध्ये ठीक ठिकाणी पोलीस गस्त सुरू असून पोलिस विनाकारण फिरणाऱ्या नागरिक व दुचाकी स्वरांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.