विकेंड लॉकडाऊन ला देवगडात प्रतिसाद

विकेंड लॉकडाऊन ला देवगडात प्रतिसाद

*कोकण Express*

*विकेंड लॉकडाऊन ला देवगडात प्रतिसाद…*

*अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद*

*देवगड ः प्रतिनिधी*

विकेंड लॉकडाऊनला देवगड तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.देवगड जामसंडे शहर व तालुक्यात सर्व ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने तालुक्यातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शनिवार, रविवार दोन दिवस विर्केड लॉकडाऊन शासनाने जाहीर केल्यानंतर शनिवारी पहिल्या दिवशी बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.अपवाद वगळता बहुतांशी नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले.देवगड जामसंडे शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले होते. देवगड स्टँड, मांजरेकर नाका, कॉलेज नाका, जामसंडे बसस्टँड या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सकाळच्या सत्रात दुध व वृत्तपत्रे घेवून नागरिक घरी गेले.दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊनमुळे शुक्रवारीच नागरिकांनी आवश्यक साहित्य खरेदी केले. देवगड एस्टी स्थानकातही प्रवाशांचा शुकशुकाट होता.सकाळच्या सत्रात देवगड कणकवली ही एकमेव \ेरी सोडण्यात आली मात्र या \ेरीला प्रवाशीवर्गाचा प्रतिसाद नव्हता.तर विजयदूर्ग आगारातून विजयदूर्ग कणकवली व विजयदूर्ग देवगड अशा दोन \ेèया सोडण्यात आल्या मात्र त्यांनाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!