*कोकण Express*
*नांदगाव येथे नागरिकांची बाजारात खरेदीसाठी झुंबड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज खरेदीसाठी बाजारात तोबागर्दी झाली होती. शनिवार व रविवार या दिवशी संपूर्ण बंद असल्याने आज ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. यात मासळी व चिकन , भाजीपाला, तसेच किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी होती.शनिवार व रविवार या दिवशी संपूर्ण बंद असल्याने तसेच सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून रविवारचा आठवडा बाजार ही बंद असल्याने ग्राहकांनी खरेदी करून घेतली यात नांदगाव हा देवगड ,विजयदुर्ग ,मिठबाव अशा ठिकाणी वरुन येणाऱ्या मासळी साठी प्रसिद्ध आहे. यामुळे येथे ग्राहकांनी रविवारची मासळी व चिकन खरेदी करून घेतली.