महास्वच्छता अभियानात एक टन कचरा संकलित

महास्वच्छता अभियानात एक टन कचरा संकलित

*कोंकण एक्सप्रेस*

*महास्वच्छता अभियानात एक टन कचरा संकलित*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने २० सप्टेंबर रोजी झुलता पूल ते नवाबाग समुद्र किनारा परिसरात वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सुमारे एक टन कचरा वर्गीकृत तो संकलित करण्यात आला.
या मोहिमेत मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, प्रशासकीय अधिकारी अभिषेक पाटी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्वच्छता दूत डॉ.धनश्री पाटील, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, वेंगुर्ला भाजपाचे पदाधिकारी, रोटरी क्बल ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तसेच इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी, ग्रीन नेचर क्लबचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, मॅन्ग्रुव्ह व्यवस्थापन समिती, बचत गटाच्या महिला, स्वच्छता प्रेम नागरिक आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!