*कोकण Express*
*…..तर आमदार नितेश राणे आमदारकी चा राजीनामा देणार काय ?*
*शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा सवाल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या जिलेटिन प्रकरणीचा तपास भलतीकडेच भरकटवला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि काही नेते, मंत्री यांना बदनाम करण्यासाठी भाजपाकडून एनआयए चा वापर केला जात आहे. यामुळे एनआयएच्य विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही लोकशाहीशी प्रतारणा आहे. एनआयएकडून भाजपा नेतृत्वाच्या सांगण्यानुसार तपास करणे दुर्दैवी असून सत्य समोर यायचे असेल तर केंद्राच्या संस्थांनी महाराष्ट्र पोलिसांना सोबत घेऊन तपास करावा सत्य आपोआप समोर येईल असे आव्हान सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचे संकट उभे राहिले.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे सर्व मंत्री, नेतेमंडळींनी जनतेचा विश्वास संपादन केला. यामुळे भाजपा बिथरले आहे. कोणत्याही स्थितीत राज्य सरकार पाडायचे यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व हातखंडे भाजपकडून वापरले जात आहेत. परमवीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले ते सर्व आरोप मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी फेटाळले. तसेच परमवीर सिंग यांनी जे व्हाट्सअप चॅट समोर आणले, ते श्री भुजबळ व संजय पाटील यांनीही नाकारले आहे. अशी कोणतीही मिटिंग झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गृहमंत्र्यां सोबत एकही वेळ भेट झाली नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर येते. परमवीर सिंग कोणाच्या दबावाखाली हे आरोप करतात हे चौकशीत पुढे येईलच. मात्र आता एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाजे यांनी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नेते जिल्ह्याचे सुपुत्र व परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे. मात्र भाजपाच्या जबाबदार नेते मंडळी कडून चार दिवस अगोदरच राज्यातील आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असे सांगितले जात होते. यामुळे ही माहिती अगोदरच भाजपच्या नेत्यांना समजते. म्हणजेच केंद्राच्या तपास एजन्सी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. केंद्राची तपास यंत्रणा भाजप स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचे दिसून येते.
तपासादरम्यान वाजे कडे जी वोल्वो गाडी सापडली ती मनीष भतेजा यांची होती. ती गाडी वाजे वापरत होता. हा मनीष भटेजाचां भाजपमधील बडा नेता असलेला भागीदार कोण आहे ?. या प्रकरणात भाजप नेते मंडळी अडकणार असल्याचे दिसताच महा विकास आघाडीला टार्गेट करून स्वतःचे पाप लपवण्यासाठी एनआयएचां वापर केला जात आहे. एनआइए कडून जो जिलेटिन संदर्भातल्या तपास व्हायला हवा होता. तो दुसरीकडे भरकटवला जात आहे. वाजे यांचे पत्र म्हणजे एक बनावट कारस्थान आहे. हे पत्र त्याचे स्वतःचे की तपास यंत्रणेने टाकलेला लेटर बॉम्ब आहे, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. जो वाजे इम्पोर्टेड गाड्या घेऊन येत होता. तपासात त्याच्याकडे या गाड्या सापडल्या त्या वाजेच्या पत्रातील काही उल्लेख न जुळणारे आहेत. वाजे करत असलेले आरोप तथ्यहीन व महा विकास आघाडी सरकारची बदनामी करण्यासाठी करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. यासाठी एनआयए यासारख्या संस्थांचा वापर करून भाजप महा विकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना त्यात कधीही यश येणार नाही. परमवीर सिंग यांच्यावर दबाव आणताना त्यांना दिल्लीला घेऊन जाणारा भाजपा नेता कोण होता? वाजेचे लेटर आणि एकूण तपास याचा नेमका संदर्भ काय आहे? केवळ दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय तपास संस्थांचा वापर केला जात आहे. परमवीर सिंग आणि वाजे चे संबंध किती जवळिकीचे होते, हे सर्वांनाच माहीत आहे. वाजे परमवीर सिंग यांसाठी रिपोर्टिंग करत होता हे सत्य आहे. महाविकास आघाडीचे मंत्री सेना नेते कोणीही भ्रष्टाचार करत नाही. शिवसेना नेते हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित असलेले असल्याने ते अशी चूक करणार नाहीत. केंद्रीय तपास संस्थांनी महाराष्ट्र पोलिसांना सोबत घेऊन तपास केला तर सत्य निश्चितच समोर येईल. मात्र भाजप नेतृत्वाच्या सांगण्यावरून तपास करून अहवाल केला तर ते लोकशाहीसाठी दुर्दैवी ठरेल.
तसेच मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप होताच राजीनामा मागणारे आमदार नितेश राणे, त्यांच्यावर आरोप झाला तर आमदारकीचा राजीनामा देणार का? असा सवालही अतुल रावराणे यांनी उपस्थित केला आहे.