*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन केला भाजपात पक्ष प्रवेश*
*▪️विधानसभा प्रमुख मनोज रावराणे आणि कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश*
नवीन कुर्ली येथील ग्रामस्थ अनंत दळवी, सुभाष दळवी, सुरेंद्र पवार, वासुदेव परब, धोंडू चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी नवीन कुर्ली गावात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मनोज रावराणे, दिलीप तळेकर यांनी प्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. आणि नवीन कुर्ली गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली.
सतत होणाऱ्या प्रवेशामुळे नवीन कुर्ली गावातील भाजपाची ताकत वाढली आहे. पक्ष प्रवेशावेळी, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे,कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, लोरे शक्तिकेंद्र प्रमुख अलंकार रावराणे,राजेंद्र कोलते, अमित दळवी, बूथ अध्यक्ष अतुल डऊर, प्रदीप कामतेकर ,सखाराम हुंबे,आशिष पेडणेकर ,प्रदीप आग्रे,अरुण पिळणकर, कृष्णा परब, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण ,मंगेश मडवी, सुनील गोसावी, रोहित चव्हाण, प्रकाश भोगले, सचिन साळसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.