दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक

दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक

*कोंकण एक्सप्रेस*

*दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक*

*प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन*

*सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका) :-*

दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था मिरज येथे आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई ची शासन मान्यता आहे. संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 प्राप्त झाला आहे. या संस्थेत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधावा. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी, असे आवाहन शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज चे अधिक्षक यांनी केले आहे.
प्रवेशासाठी नियम, अटी व सवलती पुढीलप्रमाणे :- सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) साठी किमान इयत्ता 8 वी पास. मोटार ॲन्ड आमेंचर वायडींग सबमर्सिबल पंप सिंगलफेज (इलेक्ट्रीक कोर्स) साठी किमान इयत्ता 9 वी पास आवश्यक आहे. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष असून प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा आहे. या संस्थेत फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. अद्ययावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायायाठी बीज भांडवल योजना.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक फलक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, पिन कोड-416410, दुरध्वनी क्रमांक 0233-2222908, मोबाईल क्रमांक 9922577561, 9595667936, 9325555981 या पत्त्यावर पोस्टाव्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट व प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल, असे संस्थेचे अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!