डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे जिल्हयात खत निर्मिती प्रकल्प

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे जिल्हयात खत निर्मिती प्रकल्प

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे जिल्हयात खत निर्मिती प्रकल्प*

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचा उपक्रम : वृक्ष लागवड व संवर्धनाअंतर्गत ‘निमल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती अभियान.
पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड ज्यांच्या वतीने पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य तसेच देशपातळीवर राबविले जातात. यापैकीच वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमाअंतर्गत प्रतिष्ठान तर्फे गेली १५ वर्षे सिंधुदुर्ग. जिल्हयात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे सुमारे ५ ते ६ वर्षे संगोपन करून शासनास हस्तांतरण देखील करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात दिड दिवस ते अकरा दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माल्य ठिकठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकले जाते. यामुळे ते वाया जाऊन पाणी खराब होते. त्यामुळे असे निर्माल्य प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांद्ववारे संकलित करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते. अशाप्रकारे पर्यावरणपूरक अभियानातून तयार होणारे कंपोस्ट खत प्रतिष्ठान- मार्फत लागवड केलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.
यावर्षी संपूर्ण जिल्हयातील मालवण तालुक्यात बंदर जेटी, चिंदर, सावंतवाडी तालुक्यातील बांदा,चराठा, कणकवली तालुक्यात जानवली, हळवल,कासार्डे,फोंडाघाट, कुडाळ तालुक्यात पिंगुळी, वेंगुर्ले येथे अणसूर,देवगड तालुक्यात शिरगाव तसेच वैभववाडी येथे कोकिसरे अशा 13 वेगवेगळ्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रत्येक ठिकाणी निर्मात्य कलशामध्ये निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रतिष्ठान तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले. अशा प्रकारे सुमारे 405 श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ६ टन निर्माल्य संकलित केले. या उपक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!