*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथे इनामदार श्री पावणाई देवालयात ११ सप्टेंबर पासून अंखड हरिनाम सप्ताह*
*शिरगाव | संतोष साळसकर*
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-यांऐशी खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात गुरुवार ११ सप्टेंबर ते बुधवार १७ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या हरिनाम सप्ताहात भजनी मेळे, दिंड्या घेऊन सहभागी व्हावे.व पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेऊन हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असे समस्त ग्रामस्थ मंडळी, बारा-पाच मानकरी, व देवस्थान विश्वस्त समिती यांनी कळविले आहे.
तसेच सांयकाळी ७ ते ९ या वेळेत येणाऱ्या भजनी मंडळींसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.