देवगड- कुणकेश्वर रस्त्यावर गांज्याची देवाण घेवाण

देवगड- कुणकेश्वर रस्त्यावर गांज्याची देवाण घेवाण

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड- कुणकेश्वर रस्त्यावर गांज्याची देवाण घेवाण*

*एलसीबीने चौघांना रंगेहात पकडले*

*देवगड: प्रशांत वाडेकर*

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. मिलिंद महादेव कुबल (५६, रा. आनंदवाडी-देवगड), मनोज वसंत जाधव (५०, रा. देवगड किल्ला-देवगड), सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (२५, रा. तारकर्ली काळेथर- मालवण), गौरव विनोद पाटकर (२२, रा. वायरी आडवण) अशी संशयितांची नावे आहेत. या कारवाईत ३ हजाराच्या गांजासह दोन दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चारही संशयितांविरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवगड परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार कुणकेश्वर ब्राह्मणदेव मंदिर परिसरात दोन दुचाकींवर मिलिंद महादेव कुबल, मनोज वसंत जाधव, सिद्धेश अनिरुद्ध मयेकर, गौरव विनोद पाटकर हे संशयित थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पथकाने त्यांना शिताफीने पकडले. संशयितांच्या झडतीत सुमारे ३ हजार रू. किंमतीचा ९५ ग्रॅम गांजा तसेच १ लाख ५० हजार रू. ची पल्सर दुचाकी, ७० हजार रू. ची टीव्हीएस ज्युपिटर असा एकूण २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक चौकशीत हा गांजा मालवणमधील सिद्धेश मयेकर व गौरव पाटकर यांना देण्यासाठी आणल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, विल्सन डिसोझा, प्रकाश कदम, आशिष जमादार, महेश्वर समजीस्कर यांचा समावेश होता. या घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार आशिष जमादार यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!