*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उपनेते माननीय संजयजी आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड फणसे पडवणे येथे धार्मिक कार्यक्रम*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
शिवसेना उपनेते माननीय श्री संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील फणसे पडवणे येथील ग्रामदैवत श्री विमलेश्वर मंदिरात अभिषेक पूजेनं धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.
या सोहळ्याला युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री दिनेश गावकर, युवासेना तालुकाप्रमुख श्री निखिल परकर, पुरळ विभाग प्रमुख श्री साईनाथ काळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते श्री विनायक नाटेकर, श्री साहिल फाटक, श्री यश नाटेकर, श्री सुमित घारकर, श्री संजय शिरसेकर, श्री संदेश जाधव, श्री आदित्य गावकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
ब्राह्मणकरवी श्री चरणी अभिषेक करून माननीय संजयजी आंग्रे यांच्या दीर्घायुष्याबरोबरच यशस्वी राजकीय वाटचालीसाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.