भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे, बागतळवडे, तळेबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने रकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. सोबत युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर, युवासेना तळेबाजार शहर प्रमुख लोकेश माणगावकर उपस्थित होते. भाकरवाडी युवक क्लब तळवडे यांच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
भाकरवाडी युवक क्लब तळवडे यांनी रक्तदान शिबीर घेऊन एक सामाजिक उपक्रम या तळवडे गावात राबविला. आपण सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात काम करत असून आपले कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी असेच समाजउपयोगी उपक्रम राबवावे, यासाठी लागणारी मदत आपण वेळोवेळी करू असे यावेळी नाईक यांनी सांगितले. रक्तदान हेच श्रेष्ठदान हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून तळवडे सारख्या गावात रक्तदान शिबिराचे उत्तम आयोजन आपल्या मंडळाने केला. आपला आदर्श हा इतर गावातील मंडळांनी घ्यावा, असे यावेळी नाईक यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद दुखंडे, सरपंच गोपाळ रुंबडे, माजी सरपंच गणेश लाड, रतनकुमार जाधव, बाबू भांड, अशोक कडू, अनिल सावंत, सुशील म्हापसेकर, मयूर सावंत, सुभाष सावंत, दीपक अनुभवने, दीपक दळवी, इम्राम साटवीलकर, दिनेश लब्दी, दिनेश पाडावे, जयप्रकाश दुखंडे, उपसरपंच भाग्यश्री धुरी, सदस्य भावना शिंद्रे पंकज दुखंडे, आदी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!