*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला नगरवाचनालयाचे पुरस्कार जाहीर*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
येथील नगरवाचनालयातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये विनोद मेतर (कोचरे शाळा), तेजस बांदिवडेकर (वजराट शाळा), निशा वालावलकर (बावडेकर विद्यालय) या शिक्षकांचा तसेच भटवाडी शाळा नं.१ यांचा समावेश आहे.
नगर वाचनालय, वेंगुर्ला ही संस्था गेली ३८ वर्षे आदर्श शिक्षक, शिक्षिका पुरस्कार वितरीत करीत आहेत. यामध्ये जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार कोचरे-मायणे प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद राजाराम मेतर यांना, कै.जानकीबाई मे. गाडेकर स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वजराट शाळा नं.१चे शिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना, अनिल श्रीकृष्ण सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार (माध्यमिक विभाग) शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या निशा विष्णू वालावलकर यांना तर रामकृष्ण पांडुरंग जोशी यांच्या देणीतून देण्यात येणारा सौ.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती आदर्श शाळा पुरस्कार वेंगुर्ला येथील भटवाडी नं.१ला जाहीर झाला आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि कार्यवाह कैवल्य पवार यांनी दिली आहे.
फोटोओळी – विनोद मेतर, तेजस बांदिवडेकर, निशा वालावलकर