*कोंकण एक्सप्रेस*
*बॅ.खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. ज्यूनिअर विभागाचे जिमखाना प्रमूख व्ही.पी.देसाई यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमात महाविद्यालयाची विद्यापिठ पदक प्राप्त खेळाडू गायत्री राणे हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.गोस्वामी, पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, क्रीडा संचालक जे.वाय.नाईक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे यांनी तर आभार हेमंत गावडे यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटोओळी – विद्यापिठ पदक प्राप्त खेळाडू गायत्री राणे हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.