एआयचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय ठरणार – विजय गांवकर

एआयचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय ठरणार – विजय गांवकर

*कोंकण एक्सप्रेस*

*एआयचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय ठरणार – विजय गांवकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अभ्यास आता प्रत्येक विद्यार्थ्याला अनिर्वाय ठरणार आहे . कारण आता यापुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करत असा, सोबत एआय विषयाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. असे प्रतिपादन पत्रकार विजय गांवकर यांनी दिगवळे , कणकवली येथे केले. गांगेश्वर सेवा मंडळ , मुंबई या संस्थेने शालांत परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता , त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कला वाणिज्य अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर कोणतीही पदवी मिळवताना केवळ पदवी पुरते शिक्षण न घेता पदवीत्तर विशेष शिक्षण घेणे आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे शिक्षण घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. भविष्यात एआय सर्वच क्षेत्रे व्यापून टाकणार आहे. फॉरेन्सिक सायन्स प्रमाणे आता फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये सुद्धा विशेष पदवी मिळवता येते. केवळ डॉक्टर बनण्याचा अट्टाहास न धरता पॅरामेडिकल किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंग असं कोणत्यातरी वेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवल्यास भविष्य नक्कीच उज्वल होईल. असं ते पुढे म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांना रोख पारितोषकासह रतन टाटा , बिल गेट्स आदी यशस्वी उद्योजकांच्या चरित्र पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष महादेव घाडीगांवकर , सचिव रघुनाथ (बबन) घाडीगांवकर खजिनदार सहादेव घाडीगांवकर ,सतीश तुकाराम घाडीगांवकर , कृष्णा घाडीगांवकर ,गणपत घाडीगांवकर,रमेश घाडीगांवकर ,
जगन्नाथ घाडीगांवकर,सुनील घाडीगांवकर,दशरथ घाडीगांवकर ,आनंद घाडीगांवकर,नारायण घाडीगांवकर,माधुरी घाडीगांवकर
शुभांगी घाडीगांवकर आदी मान्यवर तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!