मटका अड्डा रेड प्रकरण | अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू

मटका अड्डा रेड प्रकरण | अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू

*कोंकण एक्सप्रेस*

*मटका अड्डा रेड प्रकरण | अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू*

* तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात आरोपी आणि अधिकारी यांची चौकशी*

* जनतेला अपेक्षित अशी कायदेशीर कारवाई होणार*

*अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांची पत्रकारांना माहिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात मटका रेड मधील आरोपी आणि काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्याचे समजते. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या रेड नंतर सिंधुदुर्ग पोलीस दलाची नाचक्की झाली होती. या मटका अड्ड्याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दहिकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम याना दिले होते.त्यानुसार आज सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात भेट देत चौकशी केली. यावेळी डीवायएसपी घनश्याम आढाव हेही उपस्थित होते. सव्वा चार वाजल्यापासून सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत तब्बल अडीच तास संबंधित आरोपी आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडेही कसून चौकशी केल्याचे समजते. या चौकशी दरम्यान मटका गुन्ह्यातील प्रमुख आरोपींकडे वन टू वन चौकशी करण्यात आली. कधीपासून मटका अड्डा सुरू आहे, मटका अड्डा कोण चालवतो , यासह अन्य प्रश्नांची सरबत्ती आरोपींवर करण्यात आल्याचे समजते. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडेही चौकशी केल्याचे समजते. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्याशी कणकवली पोलीस ठाणे येथे पत्रकारांनी संवाद साधला असता श्रीमती साटम यांनी याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीचा प्रत्येक तपशील मीडियाला देणे अपेक्षित धरू नका.चौकशी पूर्ण झाल्यानंतर कळवले जाईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!